देवगड येथे १८ जानेवारीला जिल्हास्तरीय करोओके गायन स्पर्धा…

⚡देवगड ता.०६-:
रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि कलाप्रेमी करोओके सिंगिंग क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी रोजी सकाळी १० वा. येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भव्य करोओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख ५,५५५ रू., ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रोख ३,३३३ रू., ट्रॉफी व प – माणपत्र, तृतीय क्रमांकास रोख १,१११ रू., ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकास प्रत्येकी ५५५ रू. व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीमध्ये मराठी गीत व अंतिम फेरीमध्ये हिंदी गीतगायनाचे सादरीकरण स्पर्धकांनी करायचे आहे. स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित असून नाव नोंदणी १६ जानेवारीपर्यंत करायची आहे. नाव नोंदणी केलेले स्पर्धक स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी किरण पांचाळ (७२०८५४६७७९) व अनुश्री पारकर (९४२३८८०९६१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page