बांदा नट वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात…

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. संजय बर्वे, बांदा यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री कै. शोभना काशीनाथ बर्वे यांच्या स्मरणार्थ शालेय मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रकट वाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर यांच्यासह संचालक जगन्नाथ सातोसकर, शंकर नार्वेकर, अनंत भाटे, सौ. मृणाल बर्वे, सौ. अर्चना सावंत तसेच प्रकट वाचन स्पर्धेतील विजेते, अनेक वाचक आणि वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री भाटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेतला.
इ. ३ री व ४ थी गटात प्रथम क्रमांक – राम अवधूत लोके (सुधाताई कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २), द्वितीय सक्षम भिडे (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा), तृतीय आत्रेया आचार्य (कळसुलकर प्राथमिक शाळा, सावंतवाडी) यांना मिळाला. उत्तेजनार्थ ध्रुव नाडकर्णी आणि मांगल्य बर्वे यांना देण्यात आला.
इ. ५ वी ते ७ वी गटात प्रथम सर्वज्ञ वराडकर (केंद्रशाळा बांदा), द्वितीय बाबुराव गवस (केंद्रशाळा बांदा), तृतीय दुर्गा लोके (कळसुलकर प्राथमिक शाळा, सावंतवाडी) यांना मिळाला. उत्तेजनार्थ आराध्य आपटे (सुधाताई कामत विद्यामंदिर सावंतवाडी) व स्नेहा राणे (जिल्हा परिषद शाळा कास) यांचा सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण अनंत भाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page