⚡कणकवली ता.०२-: भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडल तालुका उपाध्यक्ष अनुप वारंग यांची निवड मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी जाहीर केली. माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते अनुप वारंग यांना निवडीचे पत्र देण्यात आले. कणकवली खा. नारायण राणे संपर्क कार्यालय येथे निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी तालुका मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, उपाध्यक्ष सोनु सावंत, खरेदी विक्री चेअरमन प्रकाश सावंत, सरचिटणीस पंढरी वायंगणकर, वागदे सरपंच संदिप सावंत, राजु पेडणेकर, उपसरपंच प्रज्योल वर्दम, उपसरपंच दिनेश गोठणकर, गणेश तळगावकर, अमेल रासम, उपसरपंच सर्वेश दळवी, सुहास राणे, बाबु नारकर, सुशिल इंदप, समर्थ कोरगावकर, अभय गावकर, श्रेयश चिंदरकर, सचिन पारधिये, परेश कांबळी, नितिन पवार, तेजस लोकरे, सचिन खोचरे, समिर प्रभुगावकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
