डॉ. प्रफुल्ल गोडकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.०१-:
वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गाऊडवाडी येथील मूळ रहिवासी डॉ. प्रफुल्ल बाबाजी गोडकर यांना कोकण राज्य अभियानातर्फे मुंबई येथे कोकणरत्न पदवी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

कोकण राज्य अभियान संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार संपादक सचिन कळझुणकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. डॉ. प्रफुल्ल गोडकर हे गेली अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसायात मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रातील मुलांना मार्गदर्शन व्हावे म्हणून त्यांनी अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे. आजवर अनेक मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. २०२२ च्या कोरोना काळात बॅ. नाथ पै सेवांगण या सामाजिक संस्थेतर्फे भरवल्या गेलेल्या आरोग्य विषयक शिबिरांसाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. कोकण परिसरातील अनेक सामाजिक संस्था, प्राथमिक – माध्यमिक शाळा, महाविद्यालयातून आरोग्य विषयक जागरूकतेचे कार्य ते अनेक वर्षे अविरतपणे करीत आहेत. डॉ. गोडकर हे गेली अनेक वर्षे नियमितपणे डिसेंबर महिन्यात मालवण येथे येऊन आपल्या सेवेचा लाभ गरजू व होतकरू व्यक्तींना देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना कोकणरत्न पदवी पुरस्काराने गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page