नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे पालकामंत्र्यांचे आवाहन
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या ३८ गावांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येणारे चक्रीवादळ धोकादायक असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. चक्रीवादळाच्या दृष्टीने जिल्ह्याची यंत्रणा काम करत असून, नागरिकांनी देखील सतर्क राहावे , गरज भासल्यास लोकांचे स्थलांतर देखील करण्यात येईल, त्यासाठी पुणे येथील इंडिया एन.डी.आर. एफ ची टीम बोलवण्यात अशी माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी लॉक डाऊन बाबत मुख्यमंत्री आज किंवा उद्या घोषणा करतील अशी माहिती त्यांनी दिली.
