डॉ. रुपेश पाटकर:कणकवली कॉलेज विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर प्रसंगी मानसिक आरोग्य या विषयावरती मार्गदर्शन..
⚡कणकवली ता.२८-: भावनिक दृष्ट्या आपण बुद्धिमान नसल्यास दुसरा व्यक्ती आपल्या मनामध्ये चुकीच्या भावना निर्माण करू शकतो. प्रेम आकर्षण आणि वासना या तीन भिन्न भावना आहेत. आकर्षणाची भावना कोणत्याही माणसाला अविवेकी वागायला भाग पाडू शकते म्हणून सध्याच्या युगामध्ये भावनिक दृष्ट्या बुद्धिमान होणे आवश्यक आहे. असे मत डॉ. रुपेश पाटकर यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष निवासी संस्कार शिबिर प्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. डॉ. किरण जगताप, प्रा सागर गावडे, प्रा. विद्या मारकड, प्रा. पूजा मुंज उपस्थित होते.
आज शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सिंहगड गटाने सदर कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रम प्रसंगी कुमारी दिव्या कदम हिने सूत्रसंचालन केले. प्रसंगी 150 स्वयंसेवक उपस्थित होते. सदर शिबिराचे आयोजन प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत केले जात आहे. आज शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सर्व स्वयंसेवकांच्या मार्फत दत्तक गाव हळवल या ठिकाणी सर्व मंदिरे व स्मशानभूमी यांची साफसफाई करण्यात आली. प्रसंगी गावचे उपसरपंच प्रभाकर राणे, ग्रामस्थ संतोष गुरव, ग्रामस्थ मारुती सावंत, विलास गावडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मंदार राणे व अनिल पाडावे उपस्थित होते.
