⚡सावंतवाडी ता.२३-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व माजी विद्यार्थ्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी मळगाव इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या ‘स्नेहमेळावा’च्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, सहसचिव समीर परब, खजिनदार अर्जुन देवळी, माजी शिक्षक दिवाकर राऊळ, बाळकृष्ण मुळीक, श्रद्धा राणे-सावंत, माजी विद्यार्थी परिवाराचे सदस्य गुरुनाथ नार्वेकर, हरीश नार्वेकर, अंतोंन फर्नांडिस, रामचंद्र केळुसकर, गणपत शिरोडकर, गुरुनाथ गावकर, माजी विद्यार्थी आनंद देवळी, हेमंत खानोलकर, कृष्णा गावकर, दाजी सोनुर्लेकर, विवेक नार्वेकर, प्रकाश राऊळ, एकनाथ खडपकर, सहदेव राऊळ, सिद्धेश तेंडोलकर, गजानन राऊळ, सतीश राऊळ, व इतर उपस्थित होते.
यावेळी ७ डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत स्नेहमेळाव्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे रीतसर वाचन करण्यात आले. त्यामध्ये नोंदणी कक्ष, सुकाणू समिती, स्वागत समिती, नियोजन समिती, प्रसिद्धी व निमंत्रण समिती, अल्पोपहार व भोजन समिती तसेच व्यासपीठ व सभागृह व्यवस्था समिती यांचा समावेश आहे. स्थापन समित्यातील सदस्यांनी काय काय काम करावे हे सांगून स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व समित्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
स्थापन करण्यात आलेल्या समित्या पुढीलप्रमाणे :
नोंदणी कक्ष समिती :
महेश गावकर, अर्जुन देवळी, सूर्यकांत सांगेलकर, पृथ्वीराज बांदेकर.
सुकाणू समिती (कार्यकारी मंडळ पदाधिकारी व सदस्य) :
राजेंद्र परब, रामनाथ राऊळ, तुळशीदास नाईक, पांडुरंग नाटेकर, बाबली नार्वेकर, गुरुनाथ गावकर, रामचंद्र केळुसकर, गणेशप्रसाद पेडणेकर.
स्वागत समिती :
समीर परब, गुरुनाथ नार्वेकर, अंतोन फर्नांडिस, श्रीकृष्ण भगत, विवेक नार्वेकर, निलेश कुडव, आनंद देवळी, गणपत शिरोडकर, मनिषा राऊळ, श्रद्धा सावंत.
नियोजन समिती :
दिवाकर राऊळ, अर्जुन देवळी, श्रद्धा सावंत, प्रभाकर तेली, हरिश नार्वेकर, बाळकृष्ण मुळीक, रामचंद्र केळुसकर, हेमंत खानोलकर.
प्रसिद्धी व निमंत्रण समिती :
महेश गावकर, सचिन रेडकर, सहदेव राऊळ, गुरुनाथ गावकर, राजेश राऊळ, गुरुनाथ नार्वेकर, सतीश राऊळ, संदेश सोनुर्लेकर.
अल्पोपहार व भोजन समिती :
हरिश नार्वेकर, रामचंद्र केळुसकर, अर्जुन देवळी, शेखर राऊळ, निलेश राऊळ, नितेश नाटेकर, गजानन प. राऊळ, नागेश मळगावकर, सिद्धेश तेंडोलकर, प्रदीप राणे.
व्यासपीठ व सभागृह व्यवस्था समिती :
समीर परब, सतीश राऊळ, प्रभाकर तेली, कृष्णा गावकर, गोपाळ नार्वेकर, अर्जुन देवळी, राजेश राऊळ, अंतोन फर्नांडिस, विलास जाधव.
आदींचा या समित्यांमध्ये समावेश आहे. सभेला उपस्थित सर्वांचे अध्यक्ष शेखर पाडगावकर यांनी आभार व्यक्त केले.
