चौकुळ येथील श्री सातेरी भावई देवस्थानचा २२ रोजी वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी : चौकुळ येथील श्री सातेरी भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २२ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळपासून देवीची ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ११ वाजता भव्य पालखी मिरवणुक व त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page