भालावल शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड…

शिवम परब व रिया परब यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड..

⚡सावंतवाडी ता.२०-: तालुकास्तरीय बाल कला क्रीडा महोत्सव सन २०२५–२६ मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भालावलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय असे यश संपादन केले.
यात,लहान गट मुलगे १०० मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात कु. शिवम दताराम परब याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर मोठा गट मुली लांब उडी या प्रकारात कु. रिया चरण परब हिने प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली असून त्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल बांदा प्रभाग विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, केंद्रप्रमुख तांबुळी आर. बी. गावडे, मुख्याध्यापिका नम्रता नारायण कोठावळे, शिक्षक गोंडूजी ढवळी, निलेखा गवंडळकर, विठ्ठल कुंभार , रुपेशकुमार गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घारु परब, उपाध्यक्ष रमेश परब, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page