साटेली भेडशी केंद्र शाळेचे समूहनृत्य तालुक्यात प्रथम…

कबड्डी, धावणे,ज्ञानी मी होणार स्पर्धेतही अव्वल.

⚡दोडामार्ग, ता.२०-:
तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात साटेली भेडशी पूर्ण प्राथमिक उपक्रमशील आदर्श शाळेने उज्ज्वल यश मिळविले. समूहनृत्य स्पर्धेत या शाळेच्या चमूने मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी केली.आता हा चमू जिल्हास्तरावर समूहनृत्य सादर करणार आहे.
शाळेच्या तन्मय सत्यवान धर्णे याने मोठ्या गटातील १०० मीटर धावणे ( मुलगे ) स्पर्धेत प्रथम क्रमांक ,तर
लहान गट (मुलगे ) कबड्डी स्पर्धेतही शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.तसेच
लहान गटातून अन्वी नारायण बुडके व खुशी सत्यवान धर्णे या विद्यार्थिनींनी ज्ञानी मी होणार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
लहान गटाच्या समूहनृत्य स्पर्धेत साटेली भेडशी शाळेने द्वितीय ,तर आडाळी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.
साटेली भेडशी केंद्रशाळेच्या मुख्याध्यापक पूनम पालव,दीपक दळवी,संपदा दळवी, नूतन शिंदे, मिलन पाटील, शिल्पा कर्पे यांनी स्पर्धेत यश मिळावे यासाठी मेहनत घेतली.गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ,केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक,शाळा व्यवस्थापन समिती,सर्व पालक,ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दोडामार्ग: समूहनृत्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या चमूला प्रमाणपत्र देताना गटशिक्षणाधिकारी नदाफ.बाजूला शाळेतील शिक्षक,सूर्यकांत नाईक,संदीप गवस,परीक्षक व इतर.

You cannot copy content of this page