⚡कणकवली,ता.१८-:
एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे “क्वांटम टेक्नॉलॉजी : ट्रान्सफॉर्मटिव्ह अॅप्रोच फॉर नेक्स्ट जनरेशन कम्प्युटिंग” या विषयावर एआयसीटीई प्रायोजित अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) ऑनलाइन पद्धतीने ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला देशभरातील विविध शैक्षणिक संस्था, संशोधन संस्थांचे संशोधक तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांकडून ३०० हून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या होत्या . कार्यक्रमाची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कॅनडा, युनायटेड किंगडम आणि भारतातील प्रख्यात विद्यापीठे व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. ह्या मान्यवरानी क्वांटम टेक्नॉलॉजीतील अत्याधुनिक संशोधन आणि उद्योग-अनुप्रयोग यावर मार्गदर्शन केले .
आयोजकांच्या माहितीनुसार, उदयोन्मुख आणि परिवर्तन घडवणाऱ्या तंत्रज्ञानांच्या अध्यापन व अनुप्रयोगासाठी आवश्यक कौशल्ये प्राध्यापक आणि व्यावसायिकांना मिळावीत, हा या एफडीपीचा प्रमुख उद्देश होता. प्रशिक्षण घेतलेले सहभागी आपल्या संस्थांमध्ये विद्यार्थी, संशोधनार्थी आणि उद्योग प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये हे ज्ञान प्रभावीरीत्या प्रसारित करून तांत्रिक प्रगतीस हातभार लावतील.
या कार्यक्रमाला खालील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले —
मा. नारायणराव राणे, खासदार, भारत सरकार व माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य;
सौ. नीलम राणे, अध्यक्ष, एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय;
डॉ. निलेश राणे, उपाध्यक्ष व आमदार, महाराष्ट्र राज्य;
तसेच मा. नितेश राणे, सचिव व मत्स्य व बंदरे मंत्री, महाराष्ट्र शासन. आणि पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा.
हा कार्यक्रम डॉ. नितीन शिवशरण आणि प्रा. तन्मय कदम यांच्या प्रभावी समन्वयाखाली आयोजित करण्यात आला होता .तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांचे या उपक्रमासाठी प्रेरणादायी सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मेकॅनिकल व एआयएमएल विभागांतर्फे एआयसीटीई प्रायोजित दोन अटल एफडीपी— अनुक्रमे एक ऑफलाइन व एक ऑनलाइन यशस्वीपणे पार पाडण्यात आले होते. त्या कार्यक्रमांचे समन्वयक डॉ. डी. एस. बाडकर होते, तर अनुक्रमे प्रा. सचिन वंजारी आणि प्रा. सुप्रिया नलावडे यांनी सह-समन्वयक म्हणून काम पाहिले होते.
सलग दोन शैक्षणिक वर्षे—२०२४-२५ आणि २०२५-२६ एआयसीटीई प्रायोजित अटल एफडीपी आयोजित करणारे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली हे कोकण विभागातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागप्रमुखांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर-संबंधित शाखांतील समिती सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. महाविद्यालयातील सर्व अध्यापक व कर्मचारी वर्गाने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे योगदान दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला .
एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी’ विषयावरील एआईसीटीई – प्रायोजित अटल एफडीपीचे आयोजन…
