Headlines

२० रोजी जिल्ह्यात श्रमदानातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन…

शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्रात राबविणार मोहीम:नागरिकांना सहकार्याचे सी ई ओंचे आवाहन..

ओरोस ता १७
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन 20 डिसेंबर 2025 रोजी श्रमदानाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत सर्वानी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ जिल्हा म्हणुन देशात प्रसिध्द आहे. तरीही स्वच्छते बाबत अधिक जनजागृती होण्याकरीता या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय स्वच्छता कार्यक्रमांत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वर्ग खोल्याची साफसफाई, शाळा परिसर स्वच्छता आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छता कार्यक्रमांत ग्रामपंचायत कार्यालय व परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच अभिलेख वर्गिकरण, अधिकारी व कर्मचारी यांची टेबल, कपाट स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय निटनेटके करणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, रंगरगोटी करणे आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्वच्छता कार्यक्रमांत कार्यालय व परिसर स्वच्छत, व रंगरगोटी श्रमदानाच्या माध्यमातुन करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 20 डिसेंबर 2025 रोजी श्रमदानाच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्यकेंद्र व उपकेंद्र यांच्या स्वच्छता कार्यक्रमांत अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आशा, ग्रामस्थ यांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे आवाहन रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page