⚡बांदा ता.१३-: व्हीजन वेलनेस फाउंडेशन, उत्तर प्रदेश यांच्या वतीने देशभरातील योगसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योगशिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर येथील फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार 2025’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
व्हीजन वेलनेस फाउंडेशन देशभरातील ऑनलाईन व प्रत्यक्ष योगवर्गांची माहिती संकलित करून समाजोपयोगी व निरंतर योगसेवा देणाऱ्या योगशिक्षकांना हा सन्मान देत असते. श्री. बांदेकर यांच्या निस्वार्थ योगसेवेची दखल घेत त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
बांदा, सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते गेल्या अनेक वर्षांपासून मोफत योगवर्ग घेऊन नागरिकांना योगसाधनेचे मार्गदर्शन करीत असून आरोग्यप्रबोधनाच्या कार्यात ते सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. श्री बांदेकर यांना लाभलेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो:-
शेखर बांदेकर.
शेखर बांदेकर यांना राष्ट्र सेवा पुरस्कार प्रदान…
