समोरच्या वाहनाने अचानक हुल दिल्याने ह्युंडाई इऑन कारचा अपघात….

माडखोल परिसरातील घटना: प्रवाशांना किरकोळ दुखापत; पोलीस घटनास्थळी दाखल..

⚡सावंतवाडी, ता.१३-:
माडखोल परिसरात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक हुल दिल्याने ह्युंडाई इऑन कारवरील ताबा सुटून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगली–मिरज येथून काही पर्यटक सुट्टीच्या निमित्ताने गोव्यासाठी प्रवास करत होते. माडखोल येथे येताच समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक हुल दिल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या भिंतीवर आदळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

You cannot copy content of this page