⚡कणकवली ता.०९-:
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत.वय वर्ष 65 पूर्ण असलेल्या ज्येष्ठानाच हा पुरस्कार दिला जातो.जेष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दोन पुरस्कार,वय वर्ष 65,तसेच एक जेष्ठ वारकरी पुरस्कार वय वर्ष 80,या प्रमाणे आणखीन दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. हे जिल्हा वारकरी संप्रदाय तर्फे पुरस्कार दिले जाणार आहेत. अर्जदार हा मंडळाचा सभासद असावा.तरी यावर्षी 2025 चे वरील पुरस्कार बाबत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडे अर्ज करावा हि विनंती. संपर्क – विश्वनाथ कृष्णा गवंडळकर – 9420261934, गणपत विश्राम घाडीगावकर -9623884116, तसेच पत्र व्यवहार – श्री. मधुकर प्रभूगावकर, साई श्रद्धा निवास, जळकेवाडी, कणकवली, या पत्यावर दिनांक 18 डिसेंबर 20 25 पर्यंत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज मागविले…
