उपजिल्हाप्रमुखांचा राजीनामा: संजू परब यांच्याकडे राजीनामा सुपूर्त..
वेंगुर्ला प्रतिनिधी- शिंदेसेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव पक्ष कार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे श्री.कोळसुलकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, राजीनामा देत असलो तरी आमदार दिपक केसरकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखालील सेनेत एक शिवसैनिक म्हणून यापुढे आपण काम करणार असल्याचे तसेच आत्तापर्यंत शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहका-यांनी मला दिलेल्या मानसन्मान व सहकार्याबद्दल मी आपला ऋणी राहीन असे नमुद केले आहे.
फोटो – सुहास कोळसुलकर
