उपसरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दत्ताराम कोळमेकर विजय…

⚡सावंतवाडी ता.०९-: माडखोल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या निवडणुकीत भाजपचे दत्ताराम कोळमेकर यांनी अटीतटीच्या लढतीत बहुमत मिळवत विजय संपादन केला.या निवडणुकीत दत्ताराम कोळमेकर यांनी ७ विरुद्ध ५ मतांनी विरोधी पॅनेलचा पराभव करत उपसरपंच पदावर निवड झाली. कोळमेकर यांचा सामना अनिता अनिल राऊळ यांच्याशी झाला होता.

गेल्या २० वर्षांपासून माडखोल ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचे मोलाचे योगदान असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, भारतीय जनता पार्टी बांदा सरचिटणीस डेगवे माजी सरपंच मधुकर देसाई, प्रविण देसाई, माजी सरपंच राजन राऊळ, अनिता राऊळ, बाळू शिरसाठ, माजी उपसरपंच व शक्ती केंद्र प्रमुख सुरेश आडेलकर, बुध अध्यक्ष सिद्धेश शिरसाठ, शैलैश राऊळ, माजी उपसरपंच अनिल परब, प्रकाश नाईक, रवींद्र राऊळ, विकास म्हाडेश्वर, लखन आडेलकर, लक्ष्मण कोळमेकर, तुकाराम पानोलकर, प्रशांत पानोलकर, रवींद्र चाफेकर, भरत राऊळ, योगेश लाड, संतोष तेली, प्रतिक गवस, गोपाळ गोवेकर, रुमेश (पिन्या) ठाकूर, सुयोग राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच माडखोल सरपंच श्रुष्णवी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य संजय देसाई, दीप्ती राऊळ, सरिता राऊळ, कैलास ठाकूर, कृष्णा उर्फ जीजी राऊळ, प्रज्ञा राणे, जान्हवी पाटील, अनिता राऊळ, विजय राऊळ, समृद्धी शिरसाठ यांचीही उपस्थिती होती.उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल दत्ताराम कोळमेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page