दोडामार्ग, दि. १३ : तळकोकण फार्मा प्रोड्युसर कंपनीतर्फे साटेली-भेडशी येथील विजयदुर्गा ॲग्रो सर्विस येथे काजू खरेदी उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक विजय कुमार रेड्डी प्रमुख उपस्थित होते.
कंपनीचे अध्यक्ष भिकाजी गणपत्ये यांनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. बँक ऑफ इंडिया कडून आवश्यक सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही व्यवस्थापक रेड्डी यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष संतोष झोरे, सचिव प्रेमनाथ कदम, संचालक नारायण गवस, नारायण नाईक, रामचंद्र भिसे, अंकुश नाईक तसेच शेतकरी मंदार गणपत्ये, नागेश धर्णे, ओंकार ठाकूर देसाई, सगुण गवस, लवू गवस व सौ. विनिता देसाई उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
साटेली-भेडशी येथे काजू खरेदीचा शुभारंभ….
