रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिक तरुणाने परत केले…

⚡मालवण ता.०९-:
मालवण वायरी येथील रेकोबा घाटी रस्त्यावर सापडलेले १० हजार रुपये असलेले पाकीट गावातील निखिल तळगावकर या प्रामाणिक तरुणाने मालकास परत केले. निखिल तळगावकर यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

रेकोबा घाटी रस्त्यावर एक पैशाचे पाकीट निखिल तळगावकर यांना आढळले. पाकिटात १० हजार रुपये असल्याचे दिसताच निखिल यांनी तत्काळ हे पाकीट सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष लुडबे यांच्याकडे सुपूर्द केले. चौकशी नंतर सदर पाकीट निलेश गोपाळ वालावलकर (मुळगाव पेंडूर, सध्या वास्तव्य वायरी) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. सेंटरिंगचे काम करणाऱ्या निलेश यांनी सेकंड हँड रिक्षा खरेदी करण्यासाठी उसने आणलेली रक्कम या पाकिटात ठेवली होती. पैशांचे पाकीट हरवल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले होते; मात्र निखिल यांच्या प्रामाणिकपणामुळे संपूर्ण रक्कम सुरक्षित परत मिळाली. निखिल तळगांवकर यांच्या या कार्याचे श्री. संतोष लुडबे, श्री. सतीश भगत यांच्या सह ग्रामस्थांनी कौतुक करत दाखवलेला हा प्रामाणिकपणाचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page