मिलाग्रीस हायस्कूलमध्ये इंग्लिश प्रायमरी च्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०५-: मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेत नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून श्री.स्टीवन डिसिल्वा ,फादर अमृत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता, हायस्कूल पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर व इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लिटा परेरा उपस्थित होते.

   यावेळी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल्स नवरंग कवायतीच्या माध्यमातून शाळांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या हाऊसच्या रंगानुसार सादर करण्यात आले.त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या विद्यार्थी वयोगटानुसार खेळांचेआयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे स्टीवन डिसिल्वा यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित पालकांचे विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या या प्रयत्नांसाठी कौतुकही केले.

         या स्पर्धेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनी शुभेच्छा देत स्पर्धेसाठी सहकार्य करणार्‍या सर्व पालकांचे आभार व्यक्त केले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून शेरॉन अल्फान्सो,शारदा गावडे ,

निलेश घाडगे व लिवी परेरा यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीचर एल्डरिया व टीचर नतालीन यांनी केले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे सदस्य, नामांकित क्रीडाशिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.शैलेश नाईक सर यांची उपस्थिती लाभली. या दिवशी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा ड्रिलचे सादरीकरण विविध माध्यमातून केले तसेच या दिवशी अंतिम सामन्यांमध्ये इंग्लिश प्रायमरी पहिली ते चौथीच्या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे विविध स्वरूपाचे खेळ तसेच उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असणाऱ्या पालकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.शैलेश नाईक सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातून कशाप्रकारे विद्यार्थ्यांचा शारीरिक ,मानसिक विकासाबरोबरच आर्थिक लाभ होऊ शकतो. यासंबंधी मार्गदर्शन केले .उपस्थित सर्व पालकांना विद्यार्थ्यांना खेळण्यास प्रवृत्त करून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी यावेळी त्यांनीआवाहनही केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनीही उपस्थित सर्व पालकांचे सहभागाबद्दल व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मेडल्स व विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
You cannot copy content of this page