तळवडे येथे ‘स्वामी लॅबोरेटरी’चे भव्य उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: तळवडे गेट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे डॉ. सावंत दवाखान्याजवळ सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी लॅबोरेटरी’चे गुरुवार, दि. ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. या नवीन रक्त व लघवी तपासणी प्रयोगशाळेमुळे तळवडे आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.

या उद्घाटन सोहळ्याला तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम. वनिता विजय मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते फित कापून लॅबोरेटरीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच विजय रेडकर मळेवाड माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, सतीश सातार्डेकर,भाई रेडकर ,बबन राऊत, जी जी मांजरेकर ,नाना सावंत, नारायण सातार्डेकर, गुरु नाईक, केशव तुळसकर , तळवडे व्यापारी संघ अध्यक्ष उदय परब , उपाध्यक्ष प्रशांत पडते, राजन काष्टये ,दत्तप्रसाद साळगावकर राजेश दळवी , वासुदेव गुंजाळ ,सायली सातार्डेकर ,भटजी अजित गाडगीळ उपस्थित मित्र मंडळी तसेच तळवडे ग्रामस्थ डॉक्टर अंगचेकर यांचीही विशेष उपस्थिती होती, त्यांनी नवीन प्रयोगशाळेला शुभेच्छा दिल्या.
श्री. कृष्णाजी सातार्डेकर व परिवार यांनी ही ‘स्वामी लॅबोरेटरी’ सुरू केली असून, या लॅबमुळे परिसरातील लोकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह वैद्यकीय तपासणी सेवा त्वरित उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कृष्णाजी सातार्डेकर व त्यांच्या परिवाराचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
स्वामी लॅबोरेटरी सुरू झाल्यामुळे तळवडे भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट झाली असून, यापुढे येथील नागरिकांना रक्त आणि लघवी तपासणीसाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page