⚡मालवण ता.०४-: मालवण आणि वेंगुर्ला येथे झालेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सूनबाई तोऱ्यात या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या वाट चुकलो देव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
इंद्रधनु कलामंच, दाभोली या संस्थेच्या मेला तो शेवटचा होता या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक राजेश गोवेकर (नाटक-सूनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक नंदकुमार तळवडकर (नाटक-वाट चुकलो देव), तृतीय पारितोषिक सिध्देश सावंत (नाटक- मेला तो शेवटचा होता) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक यश मांजरेकर (नाटक-सूनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक गौरव राऊळ (नाटक-अथांग), तृतीय पारितोषिक सोहम ठाकूर (नाटक-संदुक) नेपथ्य प्रथम पारितोषिक अर्जुन हळदणकर (नाटक- सुनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक विदेश कुमठेकर (नाटक-वाट चुकलो देवा), तृतीय पारितोषिक साईश नाईक (नाटक- अथांग) रंगभूषा प्रथम पारितोषिक गोपाळ चेंदवणकर (नाटक-सूनबाई तोऱ्यात), द्वितीय पारितोषिक भरत मेस्त्री (नाटक-अखेरचा सवाल), तृतीय पारितोषिक पराग कुबल (नाटक-वाट चुकलो देव) संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक जय तळवडकर (नाटक-वाट चुकलो देव), द्वितीय पारितोषिक शांताराम कवठणकर (नाटक- येरे येरे पावसा), तृतीय पारितोषिक अक्षय धांगट (नाटक-जिथून पडल्या गाठी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सत्येंद्र जाधव (नाटक- बायको शिवाय काय खरा नाय….) व समीक्षा फडके (नाटक- अखेरचा सवाल), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सतिश खवणेकर (नाटक- वाट चुकालो देवा), संजय नागडे (नाटक-मेला तो शेवटचा होता), दत्ताराम गोवेकर (नाटक- सूनबाई तोऱ्यात), प्रा. प्रदिप होडावडेकर (नाटक-बॅलन्सशिट), वैभवी सोकटे-परुळेकर (नाटक मेला तो शेवटचा होता), ईशा माळकर (नाटक- येरे येरे पावसा), हर्षदा बागायतकर (नाटक-भटाची बायपास), विधी नाईक (नाटक-सूनबाई तोऱ्यात)
दि.६ नोव्हेंबर, २०२५ ते २५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण व नाटककार मधुसुदन कालेलकर नाट्यगृह, वेंगुर्ला येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सुरेंद्र केतकर, श्री. विजय कोलवणकर आणि श्रीमती सुजाता गोडसे यांनी काम पाहिले.
