व्ही.एन. नाबर स्कूलमध्ये आरोग्य-जागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०४: व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदा येथे सावंतवाडी येथील डॉ. मिनल सावंत यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र घेऊन विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छतेची महत्त्वपूर्ण माहिती दिली.
शाळेतील एम.एस.ए.टी. विषयाअंतर्गत आरोग्य, स्वच्छता व अन्न तंत्रज्ञान या विषयांचे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना अधिक सखोल मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एम.एस.ए.टी. विभागामार्फत हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. तुळस येथे अनेक वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. मिनल सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. किशोरवयातील आरोग्य, स्वच्छता, पोषण यांसंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांनी डॉ. सावंत यांच्याकडून जाणून घेतल्या.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, एम.एस.ए.टी. समन्वयक राकेश परब, ऊर्जा व पर्यावरण विभागाचे निदेशक भूषण सावंत, आरोग्य–स्वच्छता व अन्न तंत्रज्ञान विभागाच्या निदेशिका रिया देसाई तसेच बागकाम व नर्सरी तंत्रज्ञान विभागाच्या निदेशिका गायत्री देसाई उपस्थित होत्या.
फोटो:
बांदा येथे व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना डॉ. मिनल सावंत.

You cannot copy content of this page