मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा…

मालवण दि प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली. दरम्यान शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचे उदघाटन मालवण वरेरकर नाट्यग्रह येथे होणार आहे. त्याचवेळी आलेल्या सर्व स्पर्धाकांची त्या ठिकाणी पुन्हा नोंदणी होईल.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष ही स्पर्धा होत असून स्थानिकांसह अनेक सामाजिक संस्था यांचा सहभाग असतो.

२००९ पासून सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन केले जाते. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष अशी स्पर्धा असून या स्पर्धेत ६ वयापासून ते ७५ वयाहून अधिक स्पर्धक भाग घेत असलेली एकमेव स्पर्धा आहे. यावर्षी तर 4 वर्ष पासून 95 वर्ष वय पर्यत स्पर्धक सहभागी होणार आहेत.

तीन पिढ्या मुलगा, वडील, आजोबा एकत्र होणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गेली तीन वर्ष पासून दिव्यांग जलतरणपटू साठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट कॅप देण्यात येणार आहे तसेच ग्रुपमध्ये विजेत्याना रोख बक्षीस, अन्य भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण आठ लाख रक्कमेची पारितोषिक, भेटवस्तू असणार आहेत. आतापर्यंत सात राज्य मधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील 23 जिल्हे यातील 1200 स्पर्धक यांनी ऑनलाईन नाव नोंदणी पुर्ण केली आहे.

स्पर्धेचे स्वरूप असे असेल

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटने तर्फे 10 किलोमीटर स्पर्धा व 1 किलोमीटर, 2 किलोमीटर फिन्स स्विमिंग स्पर्धा आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पुर्ण झाल्या नंतर ऑल इंडिया फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप होणार आहे. त्या दिवशीचा पारितोषिक वितरण चिवला येथेच होईल होणार. तर स्पर्धच्या दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जलतरण संघटना राज्यस्तरीय स्पर्धा 500 मिटर एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुप ची स्पर्धा होणार. त्याचे पारितोषिक वितरण होणार. या सागरी जलतरण स्पर्धेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली व स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. स्थानिकांकडून ही स्पर्धकाचे चांगले आदरातिथ्य केले जाते. दिव्यांगं जलतरणपटूना विशेष सहाय्य व प्रोत्साहन दिले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी खास सवलत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी संघटनेने खास सवलत दरात प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या स्पर्धकांना भाग घ्याचा त्यांनी निल लब्दे मोबा : 9665361736 यांच्याशी संपर्क साधवा. रजिस्ट्रेशन तसेच स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑटोमेटीक टायमिंग सिस्टीम

आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे यावर्षीपासून या स्पर्धेत ऑटोमेटीक टायमिंग सिस्टीम टच पॅड वापरली जाणार आहे. स्पर्धकांकडे रिस्ट वॉच असेल. तो स्कॅन होईल. वेळ नंबर त्यावर कळेल. एकूणच अधिक नवे बदल करून एक दर्जेदार असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.

You cannot copy content of this page