सातार्डा महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३८ वर्षानंतर स्नेहभेट…

सन १९८७/८८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात..

सावंतवाडी : सातार्डा महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कूलच्या सन १९८७/८८ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३८ वर्षानंतर स्नेहभेट घडून आली. यावेळी आयोजित स्नेहमेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी, गुरुजनांविषयी आदर भाव व्यक्त करत आपली मैत्रीच अतुट नाते घट्ट केले.
स्नेहमेळाव्यात प्रथम उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणी जाग्या करत आपली मनोगते व्यक्त करून शाळेविषयी, गुरुजनांविषयी आपुलकी व्यक्त करत पुढील काळात आपण शाळेच्या वाटचालीसाठी, प्रगतीसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रथमच तब्बल ३८ वर्षांनी प्रशालेत भेट झाल्याने सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. यावेळी माजी विद्यार्थ्यातर्फे प्रशाळेला भेटवस्तू देण्यात आली. यावेळी राजन हळदणकर, शरद चोडणकर, शुभांगी कवठणकर, विनोद कवठणकर, प्रशांत कवठणकर, प्रमोद कवठणकर, उल्हास कवठणकर, तुळशीदास मेस्त्री, शोभा रेडकर, गुलाबी रेडकर, वंदना धुपकर, संतोष सातार्डेकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षक सुभाष नाईक तर आभार शरद चोडणकर यांनी मानले.

You cannot copy content of this page