राठीवडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा भाजपात प्रवेश…

⚡मालवण ता.०३-:
राठीवडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाने उबाठाला धक्का दिला आहे.

ग्रामपंचायत सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच निखील जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, गावप्रमूख संतोष धुरी, सदस्य दिपाली धुरी, नारायण जाधव, प्रमोद कदम, प्रदीप धुरी, देवानंद धुरी, माजी उपसरपंच प्रकाश मेस्त्री, सचिन पुजारे, गणेश धुरी, विलास पुजारे, संतोष धुरी, सचिन धुरी तसेच अन्य ग्रामस्थ यांनी भाजपात पक्षप्रवेश केला.

मालवण नगरपरिषद निवडणूक प्रचार निमित्ताने मंत्री आशिष शेलार हे दोन दिवसांपूर्वी मालवण दौऱ्यावर आले होते यावेळी भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश पार पडला. युवा नेते दिपक सांडव व रूपा सांडव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय निकम, उपाध्यक्ष रघुनाथ धुरी, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, अंजना सामंत, शक्तीकेंद्र प्रमुख राजेश तांबे, प्रविण घाडीगांवकर, दया हाटले, अरुण परब, बुथ अध्यक्ष प्रकाश खांबल, गुरुदास पांचाळ, किंजवडेकर, गणेश धुरी, दिलीप घाडीगांवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page