कणकवली शिवसेना शाखेत आज तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.०६-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय!, जय भवानी,जय शिवाजी! असा जयघोष करण्यात आला. शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक संकेत नाईक, स्नेहा वैभव नाईक, राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, विलास गुडेकर, तेजस राणे, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, साक्षी आमडोस्कर, संजना कोलते, शीतल बाणे, रोहिणी पिळणकर, नितीन राऊळ, प्रथमेश परब, सौ. परब, चेतन पाटील, अवि सावंत, अरुण परब, उत्तम सुद्रिक, लक्ष्मण हन्नीकोड, रवी भंडारे, सचिन राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page