जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडीत १५ कर्तृत्ववान महिलांचा होणार सत्कार…

शिंदे शिवसेनेचा पुढाकार: जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे; महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर यांचे आवाहन..

सावंतवाडी : शिवसेना महिला आघाडीकडून सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथ भोसले शिव उद्यानमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम सायं ४ ते ८ या वेळेत असून यावेळी कर्तृत्ववान अशा १५ महिलाचे सत्कार करण्यात येणार आहेत.

तसेच महिलांसाठी प्रश्नमंजुषा ‘ व वेगवेगळे फनी गेम ठेवण्यात आलेले आहे. महिलांनी स्वतःचा आत्मसन्मान वाढवून आत्मनिर्भर बनावे या दृष्टीने मार्गदर्शन ही केले जाणार आहे. तसेच महिलांनी स्वप्रेरणेने आयोजित केलेले छोटे छोटे मनोरंजनात्मक असे युवतींचे कार्यक्रम ही यात सामील केलेत. या कार्यक्रमास माजी मंत्री दीपक केसरकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व माजी नगराध्यक्षा सौ.पल्लवी केसरकर यांची उपस्थिती असणार असून . महिलांचा मान सन्मान व्हावा, समाजातील महत्वाचा घटक असलेल्या स्त्रीचा आत्मसन्मान व्हावा या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत कविटकर यांनी केल आहे

You cannot copy content of this page