सातोसे येथे उद्या सदगरु सुशेणाचार्य स्वामीजी पुण्यतिथी तथा श्रीदत्त जन्मोत्सव…

सावंतवाडी : श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्‍वरी सदुपदेशक कित्ये देवेंद्र कुलोद्भव सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजींचा पुण्यतिथी महोत्सव तथा श्रीदत्त जन्मोत्सव श्री क्षेत्र सुशेण दत्त मठ, सातोसे येथे उद्या गुरुवार ४ डिसेंबर रोजी, पीठाधीश्वर अध्यात्म शिरोमणि, पद्मश्री विभूषित सद् गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळच्या सत्रात १० वाजता पूज्य सद्गुरु समाधी स्थानी महापूजा, भजन, प्रार्थना, महाआरती, दर्शन व महाप्रसाद संपन्न होणार आहेत. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात ५.०० वाजता जपानुष्ठान, पालखी पूजन, श्रीदत्त जन्मोत्सव धूपारती, प्रार्थना पालखी मिरवणूक, महाआरती, दर्शन व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. तरी सर्वांनी पुण्यतिथी महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूज्य सद्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page