विद्यार्थ्यांना गावातील पारंपारिक रिती रिवाज बाबत माहिती होण्यासाठी शाळेचा स्तुत्य उपक्रम..
सावंतवाडी : विद्यार्थांना परिसर ज्ञान व गावातील रूढी परंपरांबाबत माहिती होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साटेली तर्फ सातार्डा शाळेच्यावतीने क्षेत्रभेट उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मुलांनी श्री देवी माऊली जत्रोत्सव निमित्त मंदिर परिसरात जाऊन तेथील नागरिकांशी, दुकानदार, व्यापारी यांच्याशी हितगुज करून उत्सुकतेने जत्रेविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी सुद्धा मुलांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षिका अस्मिता आरोसकर, हेमलता चव्हाण उपस्थित होत्या. नेहमीच साटेली तर्फ सातार्डा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात..
