पिंगुळीच्या पाटकर-वर्दे कॉलेज मध्ये विविध स्पर्धांना सुरुवात…

विविध जिल्हे आणि गोव्यातून हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी सहभागी..

कुडाळ : चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाइट सेंटर कुडाळ पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्यस्तरीय हॉटेल व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी  हॉटेल क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन आज २ डिसेंबर व उद्या ता ३ डिसेंबर रोजी सॅटेलाईट  सेंटर  हिलट्रीट पिंगुळी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन  सेलेब्रिटी शेफ इशिज्योत सुरी यांच्या हस्ते झाले. यावेळी  चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज हॉस्पिटॅलिटी विभागाचे मुख्य शेफ अमोल राऊळ,  सॅटेलाइट सेंटरचे समन्वयक नोयेल फर्नाडीस, अमित गावडे, सहकारी अध्यापक आणि गोवा, सातारा, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि सिंधदुर्ग मधील हॉटेल मॅनजमेंट कॉलेजचे विद्यार्थी आणि प्रशिक्षक उपस्थित होते.
    उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेफ सुरी यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करियर करताना स्वतःला कस घडवायचं याच्यावर मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा शुभारंभानंतर केक डेकोरेशन , मॉकटेल मेकिंग, नॅपकिन फोल्ड, मास्टर शेफ, टॉवेल आर्ट, गेस द इंग्रीडिएंट, फूड फोटोग्राफी, अशा विविध स्पर्धाना सुरवात करण्यात आली. या स्पर्धेस परीक्षक म्हणून सेलिब्रिटी शेफ इशिज्योत सुरी,नामा रेस्टॉरंटचे शेफ भूषण दुगाडे, आराकीलाचे रेस्टॉरंट मॅनेजर विवेक सर, आराध्या हॉटेलचे मॅनेजर गणपत सावंत, प्रोफेसर संजय कोकरे, तसेच बारमन कुणाल मयेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page