सावंतवाडी : किनळे येथील श्री देवी माऊली सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव उद्या बुधवार ३ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यनिमित्त सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक, दुपारी नैवेद्य, भाविक भक्तांसाठी केळी- ठेवणे, नवस बोलणे-फोडणे, ओटी भरणे गाऱ्हाणे आदी कार्यक्रम होणार असून रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी प्रदक्षिणा त्यानंतर रात्री उशिरा आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, आवाहन माऊली सातेरी देवस्थान कमिटी किनळे व ग्रामस्थांनी केले आहे.
किनळे येथील श्रीदेवी माऊली सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव..
