आजगाव येथील गीताई पठण स्पर्धेत लहान गटात गायत्री शेणई तर मोठ्या गटात आराध्या नाईक प्रथम…

आजगाव मराठी शाळा, माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन..

सावंतवाडी : आजगाव येथील गीताई पठण स्पर्धेत लहान गटात गायत्री शेणई तर मोठ्या गटात आराध्या नाईकयांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मराठी ग्रंथालय आजगाव येथे या गीताई पठण स्पर्धेचे आयोजन आजगाव मराठी शाळा, माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत आजगाव केंद्रातील शाळांमधील एकूण १८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आजगाव मराठी शाळा विद्यार्थी संघाचे सचिव विलासानंद मठकर, सदस्य विनायक उमर्ये, माजी सरपंच सुप्रिया वाडकर-मेस्त्री, आजगाव केंद्र शाळेचे मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी, तिरोडा नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक दीपक राऊळ, दिगंबर तळणकर, संगीता राळकर, मराठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल प्रिया आजगावकर, वाचक रेडकर काकी, पालक प्रसाद मेस्त्री, दिव्या काळोजी, समृद्धी म्हाडगुत, स्पर्धेचे परीक्षक अनंत नाबर, प्रमोद खांडेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर संस्काराच्या दृष्टीने गीताई पठण यासारख्या स्पर्धा खूप आवश्यक आहेत. गीताई पठण करताना ते समजून घेऊन पठण केल्यास विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने संस्कार होतील, असे मत परीक्षक अनंत नाबर यांनी व्यक्त केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-(इयत्ता तिसरी ते पाचवी लहान गट)-कु. गायत्री पुरुषोत्तम शेणई – प्रथम क्रमांक -तिरोडा नं. १, कु. वरद दिलीप पांढरे – द्वितीय क्रमांक, आजगाव नं. १, कु. रुंजी संदीप नाईक – तृतीय क्रमांक धाकोरे नं. १, कु. वेदिका सागर गावडे – उत्तेजनार्थ क्रमांक (वसवाचे तळे), कु. भार्गव प्रसाद मेस्त्री – विशेष उल्लेखनीय बक्षीस (शाळा आजगाव नं. १, (इयत्ता सहावी ते आठवी – मोठा गट)- कु. आराध्या संदेश नाईक – प्रथम क्रमांक (आजगांव नं. १), कु. ईश्वरी नरेंद्र भोसले -द्वितीय क्रमांक (आजगांव नं. १), कु. सई रवींद्र गवंडे- तृतीय क्रमांक (आजगांव नं. १), कु. कनक दिनानाथ काळोजी -उत्तेजनार्थ क्रमांक विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगांव) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार सचिव विलासानंद मठकर यांनी केले.

You cannot copy content of this page