शहरातील नागरिकांचा प्रतिसाद बघता शिंदे शिवसेनेच्या पॅनलला यश मिळेल…

आमदार दीपक केसरकर:धनशक्तीला बळी न पडता विकासाला मतदान करा..

⚡सावंतवाडी ता.०१-: शहरातील नागरिकांचा प्रतिसाद बघता शिंदे शिवसेनेच्या पॅनलला यश मिळेल, माझा पाठिंबा दुसऱ्या कुणाला आहे असं सातत्याने म्हणणं योग्य नाही. माझा पाठिंबा शिंदे शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांनाच आहे. शहराचा विकास झपाट्याने सुरू आहे. त्यामुळे धनशक्तीला बळी न पडता विकासाला मतदान करा असे आवाहन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले.
श्री केसरकर यांनी मतदानाच्या पुर्वसंधेला पत्रकार परिषद घेतली . यावेळी त्याच्यासोबत श्रीधर पेडणेकर उपस्थित होते. ते म्हणाले, अंदर की बात आहे असे मंत्री नितेश राणेंच विधान चुकीच आहे. महायुतीतून आम्ही लढत होतो. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांनी याला बळी पडू नये. आजचा हा माझा लढा व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती विरोधात आहे. आज माझी तब्येत ठीक नसल्याने पूर्वीप्रमाणे सगळीकडे जाऊ शकलो नाही. काहीजणांना भेटण्याचा आज प्रयत्न केला. परंतू सर्वाना भेटू शकलो नाही.त्यामुळे सर्वांनी आमच्यासोबत रहावं असं आवाहन त्यांनी केलं.

You cannot copy content of this page