मतदानादरम्यान शिंदे शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस, कार पोलिसांच्या ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.०२-: शहरात सायंकाळी शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू असताना भाजप युवा नेते विशाल परब त्याच्या खाजगी बॉडीगार्डच्या ताब्यात असलेली स्कॉर्पिओ कार शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या अंगावर घालण्याच्या प्रकारावरून मोठा वादंग होऊन काहीसा मारहाणीचा प्रकार प्रभाग क्रमांक नऊमध्ये फॉरेस्ट ऑफिस समोर हा घडला. यानंतर संतप्त शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबधित बॉडीगार्डसह कार रोखून धरत ती पोलिसांच्या ताब्यात दिली. एकूणच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सावंतवाडी शहरात निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले.

सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सावंतवाडी शहरात सर्वत्र शांततेत मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक सात मध्ये सुरुवातीला पैसे वाटपाचे संशयावरून धक्काबुक्की आणि बाचाबाची चा प्रकार घडल्यानंतर, सायंकाळी पुन्हा एकदा या प्रकाराने शहरातील शांतता बिघडण्याचा प्रकार घडला.

You cannot copy content of this page