विशाल परब यांचे सावंतवाडीकरांना आवाहन:शहराचा कायापालट करण्यात मी अपयशी ठरलो, तर राजकारणातून संन्यास घेईन,..
⚡सावंतवाडी ता.०१-:
तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी, असे आवाहन भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले. “मला कोणावर टीका करायची नाही. सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहेत. जनतेने भाजपला एकदा संधी द्यावी. शहराचा कायापालट करण्यात मी अपयशी ठरलो, तर राजकारणातून संन्यास घेईन,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राज्यात व देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. विकास कामांसाठी योग्य माध्यम मिळण्यासाठी नागरिकांनी भाजपला विश्वासाने मतदान करावे. उद्या दिलेला एक मत पुढील पाच वर्षे नागरिकांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
