आनंद शिरवलकर यांची सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्यातून १ वर्षसाठी हद्दपार…

कुडाळ : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद भास्कर शिरवलकर (वय ४३, रा. केळबाईवाडी कुडाळ) यांना कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कुडाळ पोलिसांकडून आज त्यांना गोवा हद्दीत हजर करण्यात आले. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिलेले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित केली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील गदीं मारामारी, मनाई आदेशाचा भंग, दंगल, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, दगडफेक करणे यासारखे गुन्हे करणारा अभिलेखावरील गुन्हेगार आनंद भास्कर शिरवलकर, (वय 43 वर्षे रा. वेताळबांबर्डे, सध्या रा. केळबाईवाडी ता कुडाळ) याचे विरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याकरीता अहवाल उप विभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचेकडे पाठविण्यात आलेला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात सदर प्रस्तावाची सुनावणी होवुन नमुद गुन्हेगार आनंद भास्कर शिरवलकर, (वय 43 वर्षे) यास एक वर्षाकरीता सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातुन हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार नमुद गुन्हेगारांस हद्दपारीचे आदेशाची कुडाळ पोलीस ठाण्या मार्फत बजावणी करण्यात आलेली असुन नमुद आरोपी हा हद्दपारीचे कालावधीत गोवा राज्यात कलंगुट येथे राहणार असल्याने त्यास आज दि. 01.12.2025 रोजी गोवा राज्यातील कलंगुट पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार, कृष्णा केसरकर, संजय कदम, सुजाता तेंडोलकर, तत्कालीन अंमलदार प्रितम कदम उषा आईर यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page