मालवण न प निवडणुकीत भाजपाचे श्री. सन्मेष परब आणि सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या विजयाचे पारडे जड असल्याचा कार्यकर्त्याचा दावा…

⚡मालवण ता.०१-: मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग ९ मधून भाजपाचे श्री. सन्मेष परब आणि सौ. अन्वेषा आचरेकर हे दोन उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुक रिंगणात उभे आहेत. परब व आचरेकर यांनी आपल्या प्रभागात प्राचारच्या तीन फेऱ्या पूर्ण करीत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. दोन्ही उमेदवारांनी प्रभागात केलेले काम लक्षात घेता दोघांचेही विजयाचे पारडे जड असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.

मच्छिमारा समाजाची दाट वस्ती असणाऱ्या प्रभाग नऊ मध्ये मालवण किनाऱ्यावरील दांडी हा भाग येतो. मच्छिमारांच्या अनेक लढ्यांचा हा भाग केंद्रबिंदू राहिला आहे. मच्छिमारी बरोबरच पर्यटनाच्या दृष्टीनेही हा भाग महत्वाचा आहे. या महत्वापूर्ण प्रभागात भाजपने सन्मेष परब यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. सन्मेष परब हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात तसेच मच्छिमार लढ्यातील अग्रणी असे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पत्नी सौ. सेजल परब यांनी नगरसेवक म्हणून दोन टर्ममध्ये दांडी भागात विविध विकासकामे केली आहेत. दांडी शाळा ते दांडेश्वर मंदिर रस्ता व त्याचे डांबरीकरण काम सौ. परब यांनी केले. तसेच दांडी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविणे, स्ट्रीट लाईट व्यवस्था, किनाऱ्यावर हायमास्ट बसविणे, काही ठिकाणी गटार बांधणी करणे आदी विविध कामे सौ. परब यांनी केली होती. या सर्व कामात पती सन्मेष परब यांची उत्तम साथ लाभली होती. सन्मेष परब यांचा दांडी भागात चांगला लोकसंपर्क आहे. दांडी भागातील सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय पुढाकार व सहभाग असतो. दांडी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात तसेच मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असतो.

तसेच प्रभाग ९ मधील भाजपच्या दुसऱ्या उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यां गेली १० – १२ वर्षे दांडी भागातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. दांडी भागातील सामाजिक प्रश्न तसेच नागरिकांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यात, गरजूना मदत करण्यात त्यांचा पुढाकार असतो. तसेच त्या यशस्वी पर्यटन व्यावसायिक असून पर्यटन व्यवसायिकांच्या विविध प्रश्नांवर देखील त्यांनी सातत्याने आवाज उठवीला आहे. भाजपाच्या महिला मालवण शहराध्यक्ष म्हणून त्या सदैव जनतेच्या सेवेत आहेत. त्यांच्या कार्याची दाखल घेऊनच भाजपने त्यांना उमेदवारी दिली असून प्रचारादरम्यान त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

परब व आचरेकर यांनी आपल्या प्रभागात प्राचारच्या तीन फेऱ्या पूर्ण करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. दोन्हीही उमेदवारांचे प्रभागातील काम पाहता त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळून विजय पक्का असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page