वाळकेश्वर मंदिरातील वार्षिक देवकार्य उत्साहात संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
वाळके कुंटुंबियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव वाळकेश्वर मंदिरात यंदाचे वार्षिक देवकार्य (पराब) मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. श्रीदेव बांदेकश्वर व श्रीदेव वाळकेश्वर यांच्या कृपा-आशीर्वादाने हा उत्सव उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित वाळके यांनी दिली.
सोमवार दिनांक ८ व मंगळवार दिनांक ९ डिसेंबर रोजी हा पराब उत्सव विधीपूर्वक पार पडणार आहे. या दोन दिवसांत विविध धार्मिक विधी, पूजापाठ तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सर्व भाविकांनी श्री देव वाळकेश्वराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page