⚡सावंतवाडी ता.०१-:
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी आज प्रचारात आघाडी घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सावंतवाडी बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधत त्यांनी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक उमेदवारांसह आमदार केसरकर यांनी बाजारपेठ परिसरात पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला. या वेळी व्यापारी व नागरिकांनी त्यांचे स्वागत करत समस्यांवर चर्चा केली.
यावेळी तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभे राहून एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन आमदार केसरकर यांनी यावेळी नागरिकांना केले.
