⚡सावंतवाडी ता.०४-: कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या शुभहस्ते व डॉ.श्री.आस्वले , सहा.आयुक्त पशुसंवर्धन, सावंतवाडी डॉ.श्री.देसाई तालुका पशुसंवर्धन अधिकारी सावंतवाडी, सागर धाऊसकर, ग्रा.प.सदस्य स्नेहा पार्सेकर ,ग्रा.प.सदस्य निकीता परब , अर्जुन मुळीक, दुग्ध सह.संस्था मळेवाड, न्हावेली ग्रामसंघ पदाधिकारी, यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर प्रशिक्षण शिबिरात डॉ.श्री.देसाई,डॉ.श्री.आस्वले ,डॉ.श्री.चव्हाण,डॉ.बाळगी यांनी जनावरांचे आहार, आरोग्य,लसीकरण, शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
या शिबिरात न्हावेली,सोनुर्ली,निरवडे येथील शेतकरी व बचतगट महिलांनी प्रशिक्षण घेतले. तसेच सदर शिबिरात गोकुळ व कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या माध्यमातून ५० % किंमतीत गोचीड प्रतिबंधक साबण व जंताचे औषधे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन परब, संस्था सचिव व आभार प्रदर्शन श्री.चव्हाण यांनी केले.
यावेळी दुग्ध संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे डॉ विद्याधर देसाई तालुका पशुसंवर्धन अधिकारी सावंतवाडी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच डॉ.आस्वले,सहा.आयुक्त पशुसंवर्धन यांचा श्री धाऊसकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
