आमदार दीपक केसरकर:जागेसाठी सह्या दिल्या नाहीत तर आम्ही कोर्टात जाऊ आणि तिथेच आमच्या हक्काची रुग्णालय उभारू.”..
⚡सावंतवाडी ता.३०-:
“नारायण राणे आणि माझं नेतृत्व संपवून स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा डाव काहींनी आखला आहे. त्यांची नावे घ्यायची माझी इच्छा नाही. परंतु सावंतवाडीची जनता पैशांना विकली जाणार नाही,” असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला.
सावंतवाडीतील सभेत ते बोलत होते. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले, “मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी मी त्यांच्या दारी १० वेळा गेलो.
मोती तलाव परिसराच्या मुद्द्यावर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, “मोती तलाव नगरपरिषदेचाच राहणार नाही अशी योजना आहे. यांच्या घरची सून विरोधात जाणार का? युवराज्ञी आहे म्हणून नगराध्यक्ष पद हे कसं चालणार? आधी केस मागे घ्या, मग मत मागा.”
“मला संपवणं इतकं सोपं नाही. सावंतवाडीची जनता माझी खरी ताकद आहे. कितीही पैसे वाटा, काही फरक पडणार नाही. हे वाटलेले पैसे वसूल करण्यासाठीच हा सर्व घाट आहे. लुबाडलेल्या पैशाला स्थान देऊ नका,” असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
