स्पीड ब्रेकरमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात नीलेश वारंग यांच निधन…

बांदा/प्रतिनिधी
एसटीचे कुडाळ वाहतूक नियंत्रक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८) यांचे काल रात्री कुडाळ एमआयडीसी येथे दुचाकी अपघातात निधन झाले. ते कुडाळ येथून रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या सावंतवाडी येथील घरी येत होते. स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी घसरली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला.
त्यांना तात्काळ कुडाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र रात्री १२ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांनी सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ले, कणकवली येथे काम केले होते. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी बी वारंग यांचे ते सुपुत्र होत. त्यांच्या मागे पत्नी, २ मुली, आईवडील, भाऊ वहिनी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page