उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्यास निधीची कधीही कमतरता पडू देणार नाही…
⚡सावंतवाडी ता.३०-: नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार अँड.निता सावंत-कविटकर व संपूर्ण पॅनलला विजयी करा, अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडीतील प्रचारसभेत केली.
शिंदे म्हणाले, “कोकण आणि शिवसेना हे नाते कोणी तोडू शकत नाही. विधानसभेत कोकणाने शिवसेनेला भरभरून साथ दिली. सावंतवाडीचा विकास हा आमचा ध्यास आहे. येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्यास निधीची कधीही कमतरता पडू देणार नाही.”
लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी भाड्यातील सवलत, शेतकऱ्यांसाठीच्या योजना यांचा उल्लेख करत त्यांनी, “ही योजना बंद होणार नाहीत. सामान्य जनतेचा विकास हीच आमची भूमिका आहे,” असा पुनरुच्चार केला.
दीपक केसरकर यांनी सावंतवाडीवर प्रेमाने काम केले असल्याचे सांगत, “सावंतवाडीच्या काया-पालटासाठी शिवसेना आवश्यक आहे,” असे शिंदे म्हणाले.“२ तारखेला धनुष्यबाण चिन्हास मतदान करून विकासाचा भगवा सावंतवाडीवर फडकवा,” असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
