प्रभाग सातमधील प्रलंबित विकास पूर्ण करण्यासाठी माझी लढत – सौरभ ताम्हणकर…

⚡मालवण ता.२८-:
मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग सात मधून भाजपकडून सौरभ ताम्हणकर व सौ. दिपाली वायंगणकर हे दोन उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्याकडून प्रभागात प्रचार करण्यात येत आहे. गेली सहा-सात वर्ष विविध क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम यांना चालना देताना कलेला प्रोत्साहन देण्याचे काम आपण अविरत सुरु ठेवले आहे. गरीब, गरजू रुग्णांना उपचारात येणाऱ्या अडचणी लक्षात घेताना ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, या भावनेने कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता त्यांना आधार देण्याचे कार्या केले. यापुढेही क्षेत्र कोणतेही असो, समाजकार्याचा घेतलेला वसा असाच पुढे सुरु ठेवायचा आहे, या प्रभागात गेल्या तीस वर्षात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीनी या प्रभागाचा विकास प्रलंबित ठेवला असून हा प्रलंबित विकास पूर्ण करण्यासाठी मी लढत देत आहे, असे प्रतिपादन सौरभ ताम्हणकर यांनी केले.

प्रचारादरम्यान बोलताना सौरभ ताम्हणकर म्हणाले, गेली तीस वर्षे या प्रभागातील प्रलंबित राहिलेला विकास करण्यासाठी मी लढत देत असून माझ्यासोबत सौ. वायंगणकर आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांनाही मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग सातमधील माझा मित्रपरिवार, स्थानिक जनता यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी मला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. त्यावेळी निवडणुकीची कोणतीही तयारी नसतानाही प्रभागातील जनतेचा मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेऊन माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही नागरिकांचे प्रश्न, समस्या, आपल्या मानून समाजकार्यात अधिक जोमाने झेप घेतली, असेही ते म्हणाले.

मालवण शहराचा विचार करता नागरिकांसाठी स्ट्रीटलाईट सुविधा, डास निर्मुलन फवारणी, नियमित कचरा व्यवस्थापन, चांगले रस्ते, पाणी या पायाभूत सुविधा नगरपालिकेने देणे गरजेचे आहे, त्या सुविधा उपलब्ध करून घेणे ही स्थानिक नगरसेवकाची जबाबदारी आहे. मी प्रभागातील नागरिकांसाठी डास निर्मुलन फवारणी, स्ट्रीटलाईट जोडणी यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेताना त्याला वाचा फोडली. ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असो, अथवा महिलांचे प्रश्न, ते सोडवून त्यांना न्याय देण्यावर भर दिला. शहरातील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याबाबत जिल्हा वीज वितरणकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविला. जीर्ण विद्युतखांब, साहित्य बदलण्याची मागणी केली. नादुरुस्त व खड्डेमय रस्त्यांबाबत पाठपुरावा केला. काही रस्ते दुरुस्तही केले. कला क्रीडा क्षेत्राबरोबर शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातही मदत व सहकार्याची भावना कायम ठेवली, असेही सौरभ ताम्हणकर म्हणाले.

महिला, युवतींसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याच्या विविध स्पर्धा आयोजित येणार आहे. महिलांमध्ये एकीची भावना येवून त्यांच्या विचारांचे आदान – प्रदान व्हावे, या हेतूने सार्वजनिक हळदीकुंकू समारंभही आयोजित करणार आहे. मी तुमच्यातीलच आहे. तुमचे प्रश्न-समस्या कोणतेही असो, त्या सोडविण्यासाठी व तुम्हाला अपेक्षित असलेला प्रभागाचा विकास साध्य करण्यासाठी, युवकांना रोजगार मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. प्रभाग सात हा पर्यटन, मच्छिमारी व व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, या तिन्ही क्षेत्रातील घटकांना न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन, असेही श्री. ताम्हणकर म्हणाले.

You cannot copy content of this page