“शिवसेनेला संधी द्या, बदल हमखास…

आमदार महेश सावंतांचा विश्वास:सावंतवाडीत ठाकरे गटाची प्रचार रॅली उत्साहात..

⚡ सावंतवाडी ता.२८-:
नगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येत असताना सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू आहे. शहरातील विविध भागातून काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिवसैनिकांनी शहराला भगवामय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या रॅलीत दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना उद्देशून बोलताना, “शिवसेनेला एकदा संधी द्या, शहराचा काय आमूलाग्र बदल करू हे आम्ही दाखवून देऊ,” असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी शिवसेना ही जनतेच्या प्रश्नांवर काम करणारी पक्षसंस्था असल्याचे सांगितले.शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या या रॅलीमुळे परिसरात उत्साह आणि जोशाचे वातावरण निर्माण झाले.

आगामी निवडणुकीत शिवसेनेचे बळ वाढविण्यासाठी कार्यकर्ते घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेलाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page