समीर वंजारी: प्रभाग क्रमांक पाच मध्ये डोअर टू डोअर सुरू आहे जोरदार प्रचार..
⚡सावंतवाडी, ता. २८-:
उच्च शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर जनतेकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार समीर वंजारी यांनी व्यक्त केला.
प्रचार मोहिमेदरम्यान त्यांनी जनतेच्या अपेक्षांना पूर्ण न्याय देण्याचे आश्वासन दिले. “जनतेची साथ आमच्यासोबत आहे. यापुढील आयुष्य जनसेवेला समर्पित करणार असून दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करण्याची जबाबदारी माझीच राहील,” असे ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साक्षी वंजारी यांच्यासह इतर सर्व उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास समीर वंजारी यांनी व्यक्त केला.
