⚡कणकवली ता.२८-: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला आणी कणकवली नगरपरिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रानुसार संबंधित नगरपरिषदांच्या मतदार यादीसाठी कणकवलीसह अन्य तीन तालुक्यात शाळा हे मतदान केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आपापल्या केंद्रांवर १ डिसेंबर २०२५ रोजी उपस्थित राहणार आहेत.
तसेच, निवडणूक प्रक्रियेमुळे १ डिसेंबर आणि २ डिसेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी सावंतवाडी, मालवण वेंगुर्ला आणि कणकवली नगरपरिषद क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हा आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केला असून शासकीय कार्यालयांना, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला, तसेच आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आली आहे.
