वनखात्याच्या भूमिकेचा निषेध; आंदोलनकर्त्यांचे मुंडण, उद्यापासून आमरण उपोषणाची घोषणा..
⚡बांदा ता.२७-: ‘ओंकार’ हत्तीला वनतारात नेण्यापासून रोखण्यासाठी व त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्यासाठी गुणेश गवस यांनी बांदा येथील श्रीराम चौकात सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवील्याने ओंकार प्रेमिनी नाराजी व्यक्त केली. वनखात्याच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुणेश गवस यांच्यासह हेमंत वागळे व इन्सुलीचे माजी उपसरपंच सदा राणे यांनी मुंडण करून घेतले. उद्या शुक्रवार पासून याच ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री गवस यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनाला कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, साईप्रसाद कल्याणकर, रियाज खान, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शैलेश लाड, राकेश केसरकर, राजन डेगवेकर, अभिजित सिनारी, पुरुषोत्तम दळवी, प्रशांत पांगम, साईप्रसाद काणेकर, ओंकार नाटेकर, आत्माराम बांदेकर, शामू धुरी, भरत गवस, राजेंद्र येडवे, चंद्रकांत सावंत, भूषण सावंत, ओंकार नाडकर्णी, सौरभ कविटकर, गौरेश सावंत, रंजन गवस, प्रवीण सातोस्कर, चंद्रकांत गावडे, भावेश देसाई, अनुप महाजन, चिंटू कुबडे आदींसह असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
