माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली प्रवीण भोसले यांची भेट…

⚡सावंतवाडी, ता. २७-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक प्रचाराला वेग आला असून प्रचाराच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या घरी भेट देत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चा केली.

या भेटीदरम्यान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर, मनसेचे तालुका अध्यक्ष मिलिंद सागर नाणेसकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या शहरात निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कोणी कितीही अमिषे दाखवली, तरी सावंतवाडीकर ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील, असा विश्वास वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page